'संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे'; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 24 Oct 2016 08:09 AM (IST)
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात मंगळवारी नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली असताना, दुसरीकडे नवी मुंबईकर मुंढेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. आता नवी मुंबईकरांनी 'सेव्ह तुकाराम मुंढे मोहीम' देखील सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गतच वाशी रेल्वे स्थानकाजवळ नवी मुंबईकरांनी एकत्रित येऊन 'वॉक फॉर आयुक्त' हे अभियान राबवलं गेलं. यावेळी 'संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे' असे फलक हाती घेऊन, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेत मंगळवारी आयुक्तांविरोधात नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरु केली असताना, आता या ठरावाला पाठिंबा देण्यावरुनच शिवसेनेतच दोन गट पडले आहेत. शिवसेनेच्या एका गटाला आयुक्तांविरोधातील आविश्वास ठरावाला शिवसेनेने पाठिंबा देऊ नये यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. तर दुसरा गट मात्र तुकाराम मुंढेविरोधातील अविश्वास ठरावासाठी आग्रही आहे. संबंधित बातम्या