सातारा : लंडनहून आणली जाणारी वाघनखं (Wagh Nakh)  ही शिवरायांची (Chhatrapati Shivaji Maharaj) नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून करत होते. आज त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनंही पुष्टी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही असं पत्र या म्युझियमनं इंद्रजित सावंतांना पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय.. स्वतः इंद्रजित सावंतांनी  पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

  


 दरम्यान लंडन इथल्या म्युझियमने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना याबाबत पत्र पाठवलं आहे. या पत्रात  ही वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं म्हटल आहे. मग महाराष्ट्र सरकार ही वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचं खोटा दावा का करतेय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान खरी वाघ नख ही साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याचा पुरावा नाही याबाबतची अधिकची माहिती उदयनराजे महाराज स्वतः देऊ शकतील. त्यांनी याबाबत पुढे येऊन बोलावं असेही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.


व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमने पत्रात काय लिहिले?


 इंद्रजीत सावंत, सरकार सध्या जी वाघनखे भारतात आणत आहे ती 1971 साली व्हिक्टोरिआ अल्बर्ट म्युझिअमला गेली आहे. तशी सध्या सहा वाघनखे त्यांच्याकडे आहेत. .ब्रिटिश म्युझिअम आणि व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम ही दोन्ही वेगवेगळी संग्रहालय आहेत. मी सत्य सांगतोय  ज्या संग्रहालायातून भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणत आहेत. ते संग्रहालाय सांगत आहेत, ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. ही गोष्ट संग्रहालयचे संचालकांनी हो गोष्ट करार करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितली आहे. तुम्ही ही वाघनखे भारतात घेऊन गेल्यानतर ज्या संग्रहालयात वाघनखे ठेवणार आहे, तिथे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, याविषयी साशंकता असल्याचे स्पष्ट करावे, असे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमने पत्रात लिहिले आहे.


महाराष्ट्राची फसवणूक असून शिवाजी महाराजांचा अपमान 


व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमने असे  सांगितले असताना महाराष्ट्राचे मंत्री धादंत खोटे बोलत आहे. जी गोष्टी छत्रपती महाराजांची नाही ती गोष्ट महाराजांची आहे असे सांगत, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. 30 कोटींचा खर्च करत फक्त तीन वर्षासाठी असणार आहे.तसेच वाघनखांसाठी जे संग्रहालय तयार करण्यात येत आहे, त्यासाठी आठ कोटी खर्च करण्यात येत आहे. त्याचे टेंडर देखील महाराष्ट्राबाहेरील कंपनीला देण्यात आले आहे. ही महाराष्ट्राची फसवणूक असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे. 


हे ही वाचा :


Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात येणार तरी कधी? सुधीर मुनगंटीवार म्हणाले....