मुंबई : परळमध्ये बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयातील डॉक्टरांनी ८ वर्षाच्या मुलावर एक विलक्षण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. साप चावल्यानंतर झालेल्या गंभीर संसर्गामुळे ताल्हा उमर शेख याच्या डाव्या हातात व्यंग निर्माण झाले होते. मायक्रोव्हॅस्क्युलर हँड सर्जरी करून ताल्हाचा हात वाचवण्यात आला आहे.
नांदेडमधील ताल्हा या ८ वर्षांच्या मुलाला खेळत असताना कपाटाच्या मागे दडून बसलेल्या सापाने दंश केला. त्यानंतर त्याला ताबडतोब स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र काही दिवसांनी ताल्हाचा डावा हात सेल्युलायटिसमुळे सुजला होता, आणि डाव्या हातात संसर्ग फैलावल्याचे दिसून आले.
हात कापावा लागेल, हा एकच पर्याय नांदेडच्या डॉक्टरांनी दिला. त्यानंतर मुंबईतील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. हात वाचविण्यात डॉक्टरांना यश आले पण जखम बरी होण्यास विलंब लागला. जखमेवर कोणतेही आवरण देण्यात आले नव्हते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संकुचन झाले होते. डावे मनगट आणि हातामध्ये व्यंग निर्माण झाले होते.
व्यंगावर काही उपचार करता येईल का याची चाचपणी करण्यासाठी त्याचे पालक त्याला वाडिया रुग्णालयात घेऊन आले. तेव्हा वाडिया बालरुग्णालयातील मायक्रोसर्जन डॉ. निलेश सातभाई यांनी दुर्मिळ आणि गुंतागुंतीची अशी मायक्रोव्हॅस्क्युलर हँड सर्जरी करून ताल्हाचा हात वाचवला.
वाडिया बालरुग्णालयात विलक्षण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2018 07:55 PM (IST)
नांदेडमधील ताल्हा या ८ वर्षांच्या मुलाला खेळत असताना कपाटाच्या मागे दडून बसलेल्या सापाने दंश केला. त्यानंतर त्याला ताबडतोब स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र काही दिवसांनी ताल्हाचा डावा हात सेल्युलायटिसमुळे सुजला होता, आणि डाव्या हातात संसर्ग फैलावल्याचे दिसून आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -