संगमनेर : संगमनेरमधील कौमार्य तपासणी प्रकरणावर पडदा पडला आहे. मुलाने पीडित मुलीची माफी मागितल्यानंतर वधू-वराने पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे.


 

लग्नानंतर कौमार्य चाचणीत नापास झाल्यानंतर जातपंचायतीच्या आदेशानंतर नवऱ्याने अवघ्या 48 तासात तिच्याशी काडीमोड घेतला, असं वृत्त होतं. मात्र जातपंचायतीविरोधात आवाज उठवल्यानंतर दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत एकत्र नांदण्याचं ठरवलं आहे.

 

मात्र कौमार्य चाचणीसारखी समाजातील कुप्रथा मोडीत निघाली पाहिजे, असं मत दोघांनी व्यक्त केलं आहे.

 

मुलाचा आधीचा दावा

मुलीच्या कुटुंबीयांनीच मला जबरदस्ती कौमार्याची परीक्षा घ्यायला सांगितली आणि पंचांचं नाव सांगितलंय. याप्रकरणाचा आणि पंचांचा काहीही संबंध नाही, असा दावाही त्यानं केला होता. एवढंच नाही तर मुलींच्या कुटुंबीयांना हे लग्न नको आहे. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली. आतापर्यंत मी त्यांना 71 हजार रुपये दिल्याचंही मुलांनी सांगितलं.

 

याशिवाय मुलीचा सांभाळ करायची तयारीही असल्याचा दावाही त्याने केला होता. त्यामुळे याप्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं होतं.

 

काय आहे प्रकरण?

 

लग्नानंतर पत्नीची कौमार्य चाचणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडली. मात्र पत्नी त्यामध्ये नापास झाल्याचा आरोप करत, नवऱ्याने अवघ्या 48 तासात तिच्याशी काडीमोड घेतला. २२ मे रोजी हा विवाह झाला होता.

 

जातपंचाच्या आदेशानं लग्नानंतरच्या पहिल्या रात्री नववधूची कौमार्य परीक्षा घेतली गेली. पतीकडे जातपंचानी एक पांढऱ्या रंगाची बेडशीट सोपवली. दोघांच्या शारिरिक संबंधांनंतरही बेडशीटला रक्ताचा डाग लागला नाही. म्हणून पत्नी कौमार्य परीक्षेत नापास असल्याचा फतवा सुनावून जातपंच मोकळे झाले.

 

पुढे बहिष्काराच्या भीतीनं मुलीच्या पालकांनी घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, अॅड. रंजना गवांदे यांनी हा प्रकार उजेडात आणला.

 

चांदगुडे यांच्या माहितीनुसार पीडित तरुणीचे पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न सुरु होते. त्यामुळे धावणं, सायकल चालवणं, लांब उड्या अशा प्रकाराचा सराव ती नित्यनेमानं करत होती. मात्र शास्त्रीय कारण न तपासता अघोरी मार्गानं कौमार्याचा निर्वाळा लावणाऱ्या जातपंचाना गृहखातं बेड्या कधी ठोकतं. हे पाहणं महत्वाचं आहे.

 

संबंधित बातम्या

नववधू कौमार्य परीक्षेत नापास, जातपंचांच्या आदेशाने पतीनं लग्न मोडलं


कौमार्य चाचणी प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल