मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 14 Jun 2016 02:47 AM (IST)
पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातल्या दोन हल्लेखोरांपैकी सारंग अकोलकर यानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. तर सध्या अटकेत असलेला डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावाही सीबीआयनं केला आहे. मारेकऱ्याचं रेखाचित्र सारंग अकोलकरशी मिळतं-जुळतं त्यासंदर्भातले पुरावे गोळा करण्याचं कामही सीबीआयनं सुरु केलं आहे. शिवाय, मारेकऱ्याचं रेखाचित्र सारंग आकोलकरशी मिळतं-जुळतं असल्याची माहिती देण्यात आली आहे. सनातनच्या आश्रमतून हार्ड डिस्क जप्त दरम्यान, काल सीबीआयनं सनातनच्या पनवेल आश्रमातून हार्ड डिस्क जप्त केली असून, त्यातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.