चंद्रपुरात रुग्णवाहिकेतून दारु तस्करी, एकाला अटक
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2016 06:37 PM (IST)
चंद्रपूर: चंद्रपुरात चक्क रुग्णवाहिकेतून दारु तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या दारु तस्करीप्रकऱणी दोघांना अटक करण्यात आली असून तब्बल सात लाखांची दारु जप्त करण्यात आली आहे. नागपूर रोडवर एक रुग्णवाहिका संशयास्पदरित्या फिरत असताना पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडलं आणि त्याच्याकडून सात लाख किंमतीच्या 70 पेट्या देशी दारु जप्त केली. अटक करण्यात आलेला आरोपी आणि रुग्णवाहिका नागपूरची असल्याची माहिती मिळते आहे. याआधी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीचे अनेक नवनवीन प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, यावेळी तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर झाल्यानं पोलिसांची चिंता वाढली आहे.