विरार : विरारचे रहिवासी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्याचे सुपुत्र मेजर प्रसाद गणेश महाडिक चीनच्या सीमेवर शहीद झाले. 30 डिसेंबरला टँकला लागलेल्या आगीत त्यांची प्राणज्योत मालवली.
विरार पश्चिमेकडील यशवंत सोसायटीत राहणारे महाडिक हे गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावचे सुपुत्र होते. 2010 पासून ते अरुणाचल प्रदेशातील तवंग भागात दारुगोळा चेक करण्याचे काम करत होते. 31 डिसेंबरलाही नेहमीप्रमाणे दारुगोळा चेक करण्यासाठी गेले असता सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक स्फोट झाला.
मेजर प्रसाद महाडिक यांचं पार्थिव आज सकाळी विरारच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे.