तब्बल 8 वर्षांनी राज्य मंत्रिमंडळाची मराठवाड्यात बैठक होती. त्यामुळे विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं या मागणीसाठी शिक्षकांनी औरंगाबादेतल्या बैठकीवर मोर्चा काढला होता. शिक्षकांचा मोर्चा आक्रमक होत असताना, पोलिसांनी खबरदारीसाठी मोर्चाला अडवलं होतं. पण त्यानंतर आंदोलकांनी दग़डफेक केल्याचा आरोप करत पोलिसांनी शिक्षकांवर लाठीचार्ज केला होता.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचं व्हिजन :
- 2306 एज्युकेशनल अॅपच्या माध्यमातून शिकवलं जातंय – विनोद तावडे
- सुमारे 14 हजार मुलं इंग्रजी शाळेतून मराठी शाळेत आली – विनोद तावडे
- दहावीतल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याचा निर्णय – विनोद तावडे
- मुलांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचा प्रयत्न – विनोद तावडे
- कलमापन चाचणीद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणांना न्याय देण्याचा प्रयत्न – विनोद तावडे
- राज्याची गणितामध्ये 60 टक्के प्रगती – विनोद तावडे
- शाळा-कॉलेजपासून पानमसाल्याची दुकानं दूर करण्याचा प्रयत्न – विनोद तावडे
- इंग्रजी काळाची गरज, पण मातृभाषा जडणघडणीसाठी महत्त्वाची – विनोद तावडे
- संस्थाचालकच शिक्षकांना मोर्चे काढायला लावतात – विनोद तावडे
संबंधित बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन
पाहा व्हिडीओ :