भारतवर्षमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास
एबीपी माझा वेब टीम | 22 Oct 2016 10:23 AM (IST)
मुंबई : एबीपी न्यूजच्या भारतवर्ष या विशेष सीरिजमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास दाखवला जाणार आहे. भारतवर्षच्या माध्यमातून इतिहासातील महत्वाच्या व्यक्तिरेखांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला जाणार आहे. एक महान योद्धा, जो प्रतिकूल परिस्थितीसमोर कधी झुकला नाही... तो लढत राहिला आणि शेवटी स्वराज्याचं स्वप्न साकार करून छत्रपती बनला... शिवरायांच्या आयुष्याची, एका वीर महानायकाची गौरवगाथा पाहायला विसरू नका. आज रात्री 10 वाजता ABP न्यूजवर