मुंबई: एकीकडे सरकार मराठा आरक्षणाच्या पेचात अडकलं असताना मित्रपक्षांकडूनही मुख्यमंत्री फडणवीसांची कोंडी सुरु करण्यात आली आहे. मंत्रिपद नाकारलेल्या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
6 नोव्हेंबरपर्यंत मंत्रिपदाच्या मागणीचा सकारात्मक विचार झाला नाही तर शिवसंग्रामच्या अधिवेशनात महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल, असं मेटेंनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रीय समाज पक्षाच्या जानकर यांची कॅबिनेटमंत्रीपदी तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. मात्र विनायक मेटेंची फक्त आमदारकीवरच बोळवण करण्यात आल्यानं ते नाराज आहेत.