Vinayak Mete Death LIVE: : विनायक मेटे यांचं अपघाती निधन, लाईव्ह अपडेट्स
Vinayak Mete Accident News LIVE Updates: : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात मेटे यांचं निधन झालं आहे.
विनायक मेटे यांच्या अपघाताच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम रसायनीमध्ये
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पथकं रसायनी पोलीस ठाण्यात
तपासणी पथकांकडून अपघातग्रस्त कारची तपासणी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात विनायक मेटे यांच्या कारला अपघात झाला. या अपघातानंतर मेटे यांची अपघातग्रस्त कार रसायनी पोलीस ठाण्यात आणण्यात आलीय... फॉरेन्सिक पथकाकडून या कारची तपासणी करण्यात येते
विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर पोलीस आता अपघाताची चौकशी करतायत. त्यासाठी आठ टीम तैनात करण्यात आल्यात. फॉरेन्सिक टीम आणि श्वास पथकाच्या मदतीनं तपास सुरु करण्यात आलाय. आरटीओ, पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधीक्षक रुपाली आंबोरे, कोकण पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केलाय.
Vinayak Mete : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. मेटे यांच्या मृत्यूनंतर काही नेत्यांनी अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. या अपघातात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा बॉडीगार्ड देखील गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात मेटे यांच्या गाडीचे ड्रायव्हर एकनाथ कदम सुदैवाने बचावले आहेत. त्यांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. विनायक मेटे यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतल्यानंतर नवी मुंबई पोलीसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याला रसायनी ( रायगड जिल्हा ) पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे.
मराठा समाजातील बांधवाना भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे ; ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्यास बळ देवो . अशा शोकभावना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत . विनायकरावांना गेली अनेक वर्ष जवळून पाहण्याचा योग आला , त्यांचा संघर्ष त्यांच्या समाजासाठी तर असायचाच पण त्याच सोबत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका असायची , भाजपसोबत असताना त्यांची गोपीनाथरावांसोबत सतत भेट व्हायची , आपला संघर्ष हा मराठा समाजाला एक दिवस न्याय मिळवून देईल याबाबत त्यांना खात्री होती , महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून नेहमी त्यांच्याशी संवाद होत असे , त्यांची तळमळ आणि शोषितांना न्याय देण्याचा आग्रह , धडपड पाहताना नेहमी त्यांचे कौतुक वाटायचे . अधिवेशन काळात विधिमंडळाच्या आवारात होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये त्यांचा आग्रह कायम विधानपरिषदेत मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा घेण्याचा असे , त्यांच्या अशा अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे . अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
विनायक मेटे यांचे बॉडीगार्ड राम डोगळे हेदेखील अपघातात जखमी. सध्या ते एमजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत
विनायक मेटे यांच्या पोस्टमार्टमसाठी आवश्यक एक इंजेक्शन मिळत नाहीय. त्यामुळे पार्थिव जे जे रुग्णालयात नेण्यात येईल. त्याठिकाणी पोस्ट मार्टम पार पडेल आणि तिथून वडाळा येथील निवासस्थानी नेण्यात येईल
विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातस्थळी फॉरेन्सिक टीम दाखल, श्वान पथक दाखल
मराठा समाजाचे लढवय्या नेतृत्व, मराठवाड्याचे सुपुत्र माजी आमदार विनायक मेटे साहेबांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाची कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आपल्या लढवय्या नेतृत्वाच्या जोरावर २५ ते ३० वर्ष विधिमंडळात अत्यंत आक्रमकपणे व अभ्यासू शैलीतून काम करताना संबंध महाराष्ट्राने पाहिले.
शिवस्मारक समितीचे अध्यक्ष म्हणुन काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे ही त्यांची इच्छा होती, दुर्दैवाने ती अपुरी राहिली असेच म्हणावे लागेल.
मराठा आरक्षण प्रश्नी लढताना त्यांच्या अनुभवी द्रष्टेपणाने अनेक समस्यांमध्ये पर्याय शोधता आले. आपल्या न्यायालयीन लढाईच्या वेळेस सुद्धा अनेक वेळा त्यांना स्वतःहुन काही सुचलं की, मला फोन करून सांगत. ते सांगितल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे.
स्व. आर. आर आबांचे ते अतिशय निकटवर्तीय होते, त्यामूळे मेटे साहेबांसोबत माझे व्यक्तिशः फार जुने संबंध होते. मला हक्काने बोलणारं एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गेल्याने खुप वेदना झाल्या. मेटे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. मेटे साहेबांना भावपूर्ण आदरांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
पनवेल उपजिल्हा रूग्णालयात पोस्टमार्टम केले जाणार, त्यानंतर पार्थिव वडाळा येथील निवासस्थानी नेणार, तिथून बीडकडे रवाना होणार, बीडमध्ये अंतिमसंस्कार होणार
कॅबिनेट मंत्री डॉ तानाजी सावंत यांचा आजचा उस्मानाबाद जिल्हा दौरा रद्द, विनायक मेटे यांना मंत्री सावंत यांनी शोकसभा घेऊन वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एमजीएम रुग्णालयात पोहोचले
बीड जिल्ह्यातील धडाडीचे नेतृत्व, माजी आ. विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याची व माझी व्यक्तिगत देखील हानी झाली आहे, मी एक मार्गदर्शक व मित्र गमावले. त्यांचे मराठा आरक्षण, शिवस्मारक या प्रश्नासोबतच आमच्या जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न यातील योगदान कधीही विसरता येणार नाही. केज तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मेटे साहेबांचा प्रवास पाहून नेहमीच अभिमान वाटायचा. ईश्वर मेटे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो... भावपूर्ण श्रद्धांजली.
विनायक मेटे यांचा अपघाती निधन अत्यंत दुर्दैवी घटना आहे... मला खूप दुःख होत आहे... माझे ते अत्यंत जवळचे मित्र होते... महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी हिरीरीने भाग घेतलेला आहे.... त्यांचा अपघाती निधन महाराष्ट्राचा मोठा नुकसान आहे... आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला आहे...रस्त्यावर अपघात होतात... लोक मृत्युमुखी पडतात... सर्वांनी संवेदनशील नागरिक बनले पाहिजे... या अपघाताचं नेमकं कारण काय हे मला माहीत नाही... मात्र आपण संपूर्ण भारताला अपघात मुक्त केलं पाहिजे... हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली होईल... विनायक मेटे यांच्या आत्म्याला शांती मिळो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठे आहे. दिवंगत श्री मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे
विनायक मेटे यांचे निधनाची बातमी मिळाल्यानंतर बीड येथील शिवसंग्राम कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, विनायक मेटे यांच्या अपघाती जाण्यामुळे अनेकांवर दुःखाचा डोंगर, बीड येथील शिवसंग्राम मोठ्या संख्येने शिवसंग्रामचे कार्यकर्ते जमले, विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी फोडला हंबरडा, अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानसभेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायकराव मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाज आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सोबत असलेले ते माझे सहकारी होते. त्यांचं अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे, अशा शोकभावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
Sharad Pawar On Vinayak Mete: आजची सकाळ धक्कादायक सकाळ आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि स्वकष्टानं आपलं कर्तृत्व गाजवणारे विनायक मेटे यांचं निधन धक्कादायक आहे. सर्व समस्यांवर मेटे यांचा बारीक अभ्यास होता. त्यांची भूमिका नेहमी समन्वयाची असायची. आंतरराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात व्हावे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी देखील त्यांनी खूप अभ्यास केला. मराठा समाजासाठी त्यांनी केलेलं काम मोठं आहे. मी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाची बैठक होती, त्या बैठकीसाठी ते मुंबईला निघाले होते. त्यांनी आज बीडमध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीसाठी फोन आल्यानं ते काल बीडहून मुंबईकडे निघाले होते.
कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाची बैठक होती, त्या बैठकीसाठी ते मुंबईला निघाले होते. मराठा आरक्षणाविषयी सातत्यानं लढणारा फार मोठा माणूस गेला आहे. मोठी आणि न भरुन निघणारी ही पोकळी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेते नवी मुंबईकडे निघाले
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य
पार्श्वभूमी
मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. कदम यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला त्यावेळी त्यांनीसांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.
कोण होते विनायक मेटे
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -