नांदेडः सध्याच्या डिजीटल युगात एखाद्या गावात अजून रस्ताच पोहचला नसल्याचं ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या आजमवाडीला अजून रस्ताच पोहोचलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे.
मुसळधार पाऊस झाल्यानंतर गावात विस्कळीत झालेलं जनजीवन अजूनही तसंच आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय.
विद्यार्थ्यांसोबतच वृद्धांनाही या परिस्थितीचा कसा त्रास होतो, हे सांगण्यासाठी या रस्त्याची दुरावस्था पुरेशी आहे. ग्रामस्थांना जा ये करण्यासाठी पाण्यातून वाट काढावी लागते.
गावात तातडीने रस्ता व्हावा यासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे, त्यामुळे ग्रामस्थांच्या या निर्णयाचा काही परिणाम होतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.