शिर्डीत होणारी दलित-मराठा ऐक्य परिषद कोल्हापुरात
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2016 09:15 PM (IST)
मुंबईः शिर्डीत होणारी दलित-मराठा ऐक्य परिषद 11 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात होणार आहे, अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. नाशिकच्या दौऱ्यात शिर्डीत होणारी परिषद तूर्तास रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रामदाल आठवलेंनी दिली होती. त्यानतंर आता या परिषदेचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं आहे. मराठा आणि दलित समाजात कोणतीही दरी निर्माण होऊ नये, या उद्देशाने रामदास आठवले यांनी दलित-मराठा ऐक्य परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेसाठी मराठा संघटनांसह विविध संघटनांना आमंत्रण देण्यात येणार आहे.