नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लोहणेर गावातील वाळूमाफिया आणि तडीपार गुंड स्वप्निल निकम उर्फ मिरच्या भय्या याचे ऑफीस गावकऱ्यांनी जाळून टाकले आहे. मिरचा भय्याने गावातील एका विधवा महिलेचा विनयभंग केला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी निकमच्या (मिरच्या) निषेधार्थ बंदची हाक दिली होती. या बंदने हिंसक वळण घेतले आहे. बंददरम्यान संतप्त नागरिकांनी या गुंडाचे ऑफीस जाळले आहे.

स्वप्निल निकम (मिरचा भैय्या) हा गेल्या दोन वर्षांपासून तडीपार आहे. तडीपार असूनही तो गावात आला होता. यावेळी त्याने आर्थिक देवाण - घेवाणीदरम्यान एका विधवा महिलेचा विनंयभंग केला. त्याच्या या कृत्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी गावात कडकडीत बंद ठेवला आहे. बंददरम्यान संतप्त ग्रामस्थांनी मिरचा भय्याचे ऑफिस तोडून नंतर जाळून टाकले. त्यानंतर गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.