नागपूर :  वेगळ्या विदर्भावर राणे, विखे आणि इतर  काँग्रेसचे बडे नेते विधान भवनात मोठे वादळ निर्माण करीत असताना, दुसरीकडे या प्रकरणावरून काँग्रेसचे विदर्भातील नेते विलास मुत्तेमवार यांनी वेगळी चुल मांडली आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून पक्षा अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडेच तक्रार करणार असल्याचे मुत्तेमवार यांनी आज स्पष्ट केले.

 

वेगळ्या विदर्भावरून नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील आदींनी काँग्रेसविरोधी भूमिका मांडत असल्याची तक्रार सोनिया गांधी यांच्याकडे करणार असल्याचं विलास मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बोलत होते.

 

काँग्रेसची भूमिका ही वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देण्याची आहे. पण स्वस्त प्रसिद्धीसाठी राज्यातले नेते अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्याची तयारी करत असल्याची टीका मुत्तेमवारांनी केली.