शिर्डी : शिर्डी संस्थानच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर मोहन अरोरा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी आणि विश्वस्त मंडळात कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांची नेमणूक करु नका, असे स्पष्ट आदेश कोर्टानं दिले आहेत.
सरकारने कोर्टाच्या आदेशाचा अवमान कसा काय केला? असा सवाल करत सुरिंदर अरोरा कोर्टात गेले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिर्डीच्या नवनियुक्त संस्थानला पार्टी करण्यात आलं आहे.
तीन दिवसांपूर्वी शिर्डी मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी नवी मुंबईतील भाजप नेते सुरेश हावरे यांची वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्षपद भाजप नेते चंद्रशेखर कदम यांना सोपवण्यात आलं आहे. यावर अरोरा यांनी आक्षेप घेतला आहे.