नागपूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांच्या राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी खरमरीत टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हा अज्ञानी बालक आहे. तो नुकतंच उगवलेलं गवत आहे. तो सध्या आपला मुळ शोधत आहे. त्याला ओबीसी आरक्षण आणि त्या संदर्भातल्या उपसमिती संदर्भात विषय काय कळतो, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.  पडळकर यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांना ओबीसी आरक्षण संदर्भातली एक उपसमिती हरवली आहे. ती समिती काम करत नाही अशा आशयाचे पत्र लिहिले होते. त्या संदर्भात प्रश्न विचारला असता वडेट्टीवारांनी पडळकरांवर टीका केली आहे. 


Vijay Wadettiwar : Imperical Data गोळा होत नाही तोवर निवडणुका पुढे ढकलण्यावर एकमत : विजय वडेट्टीवार


वडेट्टीवार म्हणाले की, गोपीचंद पडळकर अज्ञानी बालक आहे.  त्याला ओबीसी आरक्षण आणि त्या संदर्भातल्या उपसमिती संदर्भात विषय काय कळतो. तो ज्या जिल्ह्यातून येतो तिथे ओबीसी आरक्षण कमी झालेला नाही. झळ आमच्या जिल्ह्यांमधील ओबीसींना बसली आहे, असं एकेरी भाषेत विजय वडेट्टीवार यांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे. 


OBC च्या हक्काचं आरक्षण कुणी काढून घेणार असेल तर गप्प बसणार नाही : Vijay Wadettiwar


उत्तर भारतीयांच्या आरक्षणाच्या मागणीवर विजय वडेट्टीवार म्हणाले 


उत्तर भारतीयांच्या आरक्षणाच्या मागणीवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, उत्तर भारतीयांसोबत महाराष्ट्रातील लोकांचे रोटीबेटी व्यवहार वाढले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे जे अनेक वर्षे महाराष्ट्रात राहत आहेत, ज्यांचे जन्म महाराष्ट्रात झाले आहे अशांना आरक्षण देण्याचा विचार आहे. ही संख्या फार मोठी नाही. अनेक उत्तर भारतीय असे आहेत ज्यांना त्यांच्या राज्यात ओबीसीचा आरक्षण आहे. मात्र महाराष्ट्रात नाही, अशांसाठी हा विचार समोर आले आहे. 


OBC : परप्रांतीय ओबीसींना राज्यात आरक्षण देण्याची मागणी, कॅबिनेट मंत्री वडेट्टीवारांकडून समर्थन


विजय वडेट्टीवार म्हणाले  की, काल झालेल्या ओबीसी आरक्षण संदर्भातल्या सर्वपक्षीय बैठकीत एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचा इतर राज्यांनी त्या संदर्भात काय पावले उचलली आहेत.  याचा अभ्यास करण्याचा आणि तोवर निवडणुका न घेण्याचा मुद्दा चर्चेला आला आणि त्यावर सर्व पक्षांचे एकमत झाले आहे.


... तर शाळा सुरू करण्याचा निर्णय आणखी पुढे ढकलावा लागेल


वडेट्टीवार म्हणाले  की, कोरोनाची तिसरी लाट येईल याबद्दल मुख्यमंत्री वारंवार सावध करत होते. मात्र, तरीही काही लोक मंदिर उघडण्याची मागणी करत आहे. मागणी करायची आहे तर शाळा उघडण्याची करा. तिसरी लाट येईल की नाही हे कुणालाच माहित नाही मात्र गर्दी टाळणे हे गरजेचे आहे.  तिसरी लाट आली तर शाळा सुरू करण्याचा निर्णय आणखी पुढे ढकलावा लागेल, असंही ते म्हणाले.