Vijay Wadettiwar : Imperical Data गोळा होत नाही तोवर निवडणुका पुढे ढकलण्यावर एकमत : विजय वडेट्टीवार

Continues below advertisement

मुंबई : स्थानिक स्वराज्यातील निवडणुकांमधील ओबीसींचे आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत जोपर्यंत इम्पेरिकल डेटा गोळा होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या यावर सर्वांचे एकमत झाले आहे. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

इम्पेरिकल डेटा गोळ्या संदर्भात आमची चर्चा झाली. दुसरं असं की ओबीसीच्या जागा ठेऊन निवडणुका घेता येईल का? तिसरं असं की इम्पेरिकल डेटा येईपर्यंत निवडणूक गोळा करता येईल का? या तीन मुख्य मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीत इम्पेरिकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात यावर एकमत झाल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram