छत्रपती संभाजीनगर आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojna)  खात्यातून 1500 परत घेण्यात येतील असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. रवी राणांच्या (Ravi Rana)  या वक्तव्यावर महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi)  जोरदार पलटवार केलाय. रवी राणा हे शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातले बोलले असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले आहेत. रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, त्याबद्दल सरकारनं माफी मागावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केले आहे. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते. 


विजय वडेट्टीवार म्हणाले, हा सरकारचा पैसा आहे. हा पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणा की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आहे? यांची निती दिसली.  निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली. बहिणींना फसवण्यासाठी योजना आणली आहे.  रवी राणा जे बोलला ते सरकारच्या शिंदेच्या मनातील, फडणवीस आणि अजित पवार यांच्या मनातील बोलले आहेत.


वडेट्टीवारांनी घेतला खरपूस समाचार


विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केसा आहे.   मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी... आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मतं विकतील का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.  हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान, बहिणींचा अपमान आहे. ही योजना मतांसाठी आणली होती.  सरकारने राज्यातील बहिणीची माफी मागितली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले. 


काय म्हणाले होते रवी राणा?


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नोंदणी अजून सुरू आहे. पहिला हप्ता रक्षाबंधन दिवशी जमा होणार आहे.  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं, आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे दीड हजारांचे तीन हजार करू, मात्र तुम्ही निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर दीड हजार रुपयेही काढून घेऊ असं राणा म्हणाले. ज्यांच खाल्लं त्यांना जागलं पाहिजे. सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मत रवी राणा यांनी मांडले. राणांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खरपूस समाचार घेतला. 


हे ही वाचा :


भाजपचं ठरलं! विधानसभेत कोणत्या नेत्याला तिकीट द्यायचं देवेंद्र फडणवीसच ठरवणार,कोअर कमिटीचा निर्णय