नागपूर: पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक झाले.


जानकरांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधकांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत घोषणाबाजी केली.

यावेळी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

"एकनाथ खडसे साहेबांवर आरोप केले, तर त्यांचा काटा काढला आणि यांच्यावर (महादेव जानकर) गुन्हा दाखल झाला, कारवाई का नाही?" असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

खडसेंचा काटा काढला, मग जानकरांना का वाचवता, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला.

विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे आमदार आहेत.

विधीमंडळ : महादेव जानकरांबाबत कोण काय म्हणाले?

महादेव जानकरांचा नेमका वाद काय?

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली होती. शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनाही यावेळी जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिल्या. यासंबंधिचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे वृत्त वाहिन्यांवरुनही प्रसारित झाले. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत, जानकरांविरोधात तक्रार दाखल केली होती.

संबंधित बातम्या

दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांना निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव नव्हे, विनंती केली, जानकरांचं स्पष्टीकरण

काँग्रेसचा अर्ज बाद करायचा, महादेव जानकरांचा व्हिडीओ व्हायरल

विधीमंडळ : महादेव जानकरांबाबत कोण काय म्हणाले?