लग्नाच्या खरेदीला जाताना आदल्या दिवशी वधूपित्याचा अपघाती मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 13 Dec 2016 10:48 AM (IST)
शिर्डी : शिर्डीमध्ये ऐन लग्नाच्या तोंडावर चौधरी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. खरेदीसाठी चाललेल्या वधुपित्याचा लग्नाच्या आदल्याच दिवशी अपघाती मृत्यू झाला आहे. अहमदनगर-मनमाड रस्त्यावर राहता शहरात घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी लग्न असल्यामुळे वधूपिता भागवत चौधरी भाजीपाला आणणण्यासाठी स्कूटरवरुन बाहेर चालले होते. त्याचवेळी त्यांच्या स्कूटरला कंटेनरने धडक दिली. कंटेनरची धडक इतकी जबरदस्त होती, की भागवत चौधरी यांचा त्यात मृत्यू झाला. वाकडी गावचे रहिवासी असलेल्या भागवत यांच्या मुलीची आज हळद तर उद्या लग्न आहे. मात्र ऐन लग्नाच्या तोंडावर झालेल्या या आघातामुळे शोककळा पसरली आहे.