मुंबई : मुंबईतील (Mumbai) मोक्याच्या जागा उद्योगपती गौतम अदानींच्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पावसाळी अधिवेशनामध्ये आज (4 जुलै) विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक शैलीमध्ये शिंदे सरकारवर मुंबईमधील जागांकडे लक्ष वेधताना घणाघती प्रहार केला. दुग्ध शाळेची जागा अदानींना देण्यास विरोध केल्यानेच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.


अदानींना जमीन देण्यास मुंढेंचा विरोध


ते म्हणाले की, मुंबईमधील मोक्याच्या जागा अदानींना दिल्या जात आहेत. दुग्ध शाळेची जमीन सुद्धा दिली जात आहे. ही जमीन 20 हजार कोटी रुपयांची असून त्याला विरोध केल्यानेच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली, असा गंभीर आरोप सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केला. 


ते पुढे म्हणाले की मुंबईसाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. अभिमान वाटावा अशीच मुंबई आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. मात्र मिंधे सरकारने सरसकट जमिनी अदानींच्या घशात घालण्याचं काम केलं आहे. अंधेरी पुनर्विकास विकास पात्र अपात्र झाले नसताना सुद्धा अदानींच्या घशात जमीन घालण्यात आली. मोक्याच्या जागा त्यांच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचेही ते म्हणाले. मुंबई अदानींकडे गहाण ठेवण्याची भूमिका घेतली असून त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या