Supriya sule : विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) 2 ते 3 महिन्यावर अली आहे. त्यामुळं आता जुमल्यांचा पाऊस पडणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) आंनी केलं. दरम्यान, लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) चांगली आहे, मात्र, त्यामध्ये अटी शर्ती टाकल्या आहेत. खरंच योजना किती महत्वाची आहे, याचा अभ्यास सुरु आहे. यामध्ये भष्ट्राचार होऊ नये, योजनेचं स्वागत केलं पाहिजे असंही सुळे म्हणाल्या. त्या आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
कृषी खात्यात 118 कोटींचा घोटाळा
कांदा प्रश्नावर देखील सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. आम्ही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे. कांदा, साखर यासंदर्भात भेट घेत घेतली आहे. शेतकरी अडचणीत येत आहेत. पॉलिसी मेकर म्हणजे जुमलेबाजी नाही, कांदा निर्यातबंदी केली, त्याचा जगात काय परिणाम झाला, असेही सुप्रिया सुळे म्हणाले. आधीचे मोदी सरकार आणि आताचे एनडीए सरकारला लोकांनी नाकारलं आहे. कृषी खात्यात 118 कोटींचा घोटाळा झाला आहे. हा आरोप राष्ट्रीय सुरक्षा संघाने केला असल्याचे सुळे म्हणाल्या.
अजित पवार यांच्यावर झालेल्या भष्ट्राचाराच्या आरोपाचे देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं
अजित पवार यांच्यावर जे भष्ट्राचाराचे आरोप झाले, त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. माझ्या तिन्ही बहिणीवर रेड झाली होती, त्याला कोण जबाबदार आहे. महायुतीने मोदींनी याचं उत्तर द्यावे. महाविकास आघाडी कशाला उत्तर देणार असंही सुळ म्हणाल्या.
शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. मात्र उद्योजकांची कर्जमाफी केली
केंद्र सरकार हे किसान विरोधी हे सरकार असल्याची टीका देखील सुप्रिया सुळ यांनी केली आहे. पहिल्या दिवसांपासून हे दिसत असल्याचे सुळे म्हणाल्या. संभाजी भीड यांच्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. पुरोगामी महाराष्ट्रात त्यांच्याकडून महिलांचा अपमान केला जातो. त्यांच्या लोकांकडून केला जातो हे दुर्दैव असल्याचे सुळे म्हणाल्या. चुकीच्या कृषी धोरणामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. मात्र उद्योजकांची कर्जमाफी केल्याचे सुळे म्हणाल्या.
जे सत्तेत बसलेत ते फार खुश दिसत नाहीत
संसदेत जे सत्तेत बसले आहेत ते फार खुश दिसत नाहीत. कारण ते पक्ष फोडून आले आहेत. आम्ही संघर्ष करुन आलो असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवराज सिंह चौहान हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी मध्य प्रदेशमध्ये चांगलं काम केलं आहे. त्यांच्याकडे डेटा होता, म्हणून त्यांनी ती योजना चांगली राबवल्याचे चौहान म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: