मुंबई:  काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  हे दिल्लीत जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) भाजपने मोठा निर्णय घेतला आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. रविवारी  झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिला.


भाजपा प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक रविवारी पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेद्र यादव, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे उपस्थित होते.   विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी, आढावा आणि नियोजन या बैठकीत ठरले आहे.


देवेंद्र फडणवीसांना निवडणुकीसाठी संपूर्ण अधिकार : आशिष शेलार


आशिष शेलार म्हणाले,  जागावाटप जागांची निश्चिती बैठकीत ठरला आहे.  देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली आहे.   मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि राजकीय संस्कृतीला काळीमा भासण्याचे काम सर्वात प्रथम कोणी केला असेल तर ते संजय राऊत आणि उबाठा सेना आणि मग उद्धवजींनी केले. पहिलं तर मतं आमच्याबरोबर घ्यायची आणि सत्ता दुसऱ्याबरोबर स्थापन करायची . 


पंधरा दिवसांचा कार्यक्रम ठरला 


प्रत्येक विधानसभामध्ये जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे सर्व आमदार कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन आणि कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकणं याबद्दल नियोजनाचा भाग पूर्ण झाला. राज्यातील संपूर्ण 288 जागांवर संघटनेच्या मंडल युनिटवर राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदन असे पारित करून गाव पातळीपर्यंत पोहोचवणे आणि त्यामध्ये जनसहभाग करणे याचा पंधरा दिवसांच्या पुढचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला, असे आशिष शेलार म्हणाले. 


निवडणुका जिंकण्याचे नियोजन आणि  जागावाटप ठरलं


महायुतीमधील सर्व पक्षांचे आणि नेतृत्वांचे जागा निश्चित करण्याचा निर्णय झाला आहे. आमच्या सर्व मित्र पक्षांसोबत बैठक होतच आहेत. निवडणुका जिंकण्याचे नियोजन आणि त्यासोबत जागावाटप हा कार्यक्रम सुद्धा ठरला आहे. हे संपूर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू करण्याचे पक्षाने स्पष्ट केला आहे. 


हे ही वाचा :


मोठी बातमी : तुम्ही राज ठाकरेंची गाडी अडवायला लावली का, थेट प्रश्नावर शरद पवारांचं रोखठोक उत्तर