मुंबई : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. पुणे, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ आणि गोदिया या सहा ठिकाणी विधान परिषदेसाठी 19 नोव्हेंबरला मतदान झालं होतं.

  • पुणे राष्ट्रवादीचे अनिल भोसले विजयी (369 मतांनी विजय)


राष्ट्रवादीच्या अनिल भोसले यांना 440 मतं

काँग्रेसच्या संजय जगताप यांना 71 मतं
भाजपच्या अशोक येनपुरे यांना 133 मतं
विलास लांडे यांना 2 मतं

  • यवतमाळमध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी (270 मतांनी विजय)


शिवसेनेचे तानाजी सावंत यांना 348 मतं,

काँग्रेसचे शंकर बढे यांना 78 मतं,
अपक्ष संदीप बाजोरीया यांना 2 मतं,
बाद 5 मतं

  • नांदेडमध्ये काँग्रेसचे अमर राजुरकर विजयी (43 मतांनी विजय)


काँग्रेसच्या अमर राजुरकर यांना 251 मतं,

अपक्ष श्याम सुंदर शिंदे यांना 208 मतं,
बाद 12 मतं

  • सांगली-सातारामध्ये काँग्रेसचे मोहनराव कदम विजयी (63 मतांनी विजय)


काँग्रेसच्या मोहनराव कदम यांना 309 मतं,

राष्ट्रवादीच्या शेखर गोरे यांना 246 मतं,

शेखर माने (अपक्ष) 2 मतं,
मोहनराव गु. कदम (अपक्ष)  1 मत,
बाद 10 मतं

  • गोंदिया-भंडारात भाजपचे परिणय फुके विजयी (82 मतांनी विजय)


भाजपच्या परिणय फुके यांना 219 मतं,

राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांना 137 मतं,
काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल यांना 112 मतं

  • जळगावमध्ये भाजपचे चंदू पटेल विजयी (331 मतांनी विजय)


भाजपच्या चंदू पटेल यांना 421  मतं

अपक्ष विजय भास्कर पाटील यांना 90 मतं
शेख अखलाक यांना 1 मत
नोटा 1
बाद 34 मतं

चार मतदारसंघात राष्ट्रवादी तर प्रत्येकी एका मतदारसंघांत काँग्रेस आणि भाजपचे आमदार होते. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षाचा फायदा शिवसेना, भाजपला होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. लोकसभेच्या 4 आणि विधानसभेच्या 8 जागांच्या पोटनिवडणुकांचा निकालही आजच लागणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या लढती:


1.    सांगली-सातारा

•    काँग्रेस – मोहनराव कदम
•    राष्ट्रवादी – शेखर गोरे

2.  जळगाव

•    भाजप- चंदू पटेल
•    अपक्ष – विजय पाटील

3.  पुणे

•    राष्ट्रवादी – अनिल भोसले
•    काँग्रेस –  जिल्हा अध्यक्ष संजय जगताप
•    भाजप – अशोक येनपुरे

4.  यवतमाळ

•    शिवसेना- भाजप युती – तानाजी सावंत
•    काँग्रेस – शंकर बडे

5.  नांदेड

•    काँग्रेस – अमर राजुरकर
•    अपक्ष- श्यामसुंदर शिंदे

6.  गोंदिया

•    राष्ट्रवादी – रविंद्र जैन
•    भाजप – परिणय फुके
•    काँग्रेस – प्रफुल्ल अग्रवाल