पुणे : शेतकरीविरोधी कायदे संपुष्टात आणण्यासाठी राज्यस्तरीय किसानपुत्र आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. या आंदोलनाच्या मेळाव्याचं आयोजन उद्या पुण्यात करण्यात आलं आहे.


पुणे महापालिकेचे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता मेळाव्याचं उद्घाटन होणार आहे. या मेळाव्यात विविध सत्रांचं आयोजन करण्यात आलं असून वकील, साहित्यीक, कलावंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

'सर्जकांच्या सहवेदना' या सत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि कौल चित्रपटातील नायक रोहित कोकाटे बोलणार आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. या आंदोलनाचा पहिला मेळावा मुंबईत पार पडला. मुंबईमधील किसानपुत्रांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.