मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे असून भाजपने आता आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबईतून राजहंस सिंह, नागपूरातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर राज्यमंत्री सतेज पाटलांच्या विरोधात अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे विधानपरिषदेची ही निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. 


भाजपने जाहीर केलेले उमेदवार
कोल्हापूर- अमल महाडिक
धुळे-नंदुरबार - अमरिश पटेल
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
अकोला-बुलढाणा - वसंत खंडेलवाल
मुंबई - राजहंस सिंह


10 डिसेंबरला मतदान
निवडणूक आयोगाने राज्यातील सहा विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार  10 डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल 14 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मुंबईतील दोन, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलढाणा वाशिम, नागपूर या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर या निवडणूक होणार आहे


कोल्हापूरातून सतेज पाटलांच्या विरोधात अमल महाडिक
राज्यातील सर्वात चुरशीची निवडणूक म्हणून कोल्हापूरच्या जागेकडे पाहिलं जात आहे. या ठिकाणी पारंपरिक राजकीय विरोधक सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबिय हे पुन्हा या निवडणुकीच्या माध्यमातून आमने-सामने आले आहेत. गोकुळच्या वादाची थिणगी ही या निवडणुकीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


भाईंची जागा धोक्यात
मात्र सर्वांच लक्ष मुंबईच्या दोन जागंवरती आहे. कारण  मुंबईतील महाविकास आघाडीच्या दोन भाईंच्या जागा धोक्यात आल्या आहेत. या निवडणुकीत 77 नगरसेवकांनी पहिल्या पसंतीचे मत दिल्यानंतर सदस्याचा थेट विजय होतो. काँग्रेसचे संख्याबळ 29 आहे. त्यामुळे काँग्रेससाठी स्वत:चा सदस्य निवडून आणणे अशक्य बनले आहे. त्यामुळे पक्षाच्या मुंबई अध्यक्षांचीच विधिमंडळातील खुर्ची धोक्यात आली आहे.


संबंधित बातम्या :