Wardha News वर्धा : गेल्या दोन- तीन दिवसापासून उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टी सदृश्य  पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. तर या पावसाचा सर्वाधिक जोर हा पूर्व विदर्भात बघायला मिळाला असून मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला आहे.


माजी कृषीमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेले आश्वशन हवेत विरलं 


अशातच वर्ध्यात (Wardha News) झालेल्या अतिवृष्टीने शेतीपिके खरडून निघाली आहे. सेलू तालुक्यातील कोलगाव परिसरात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन आणि कपाशी पिकाला फटका बसला आहे. अनेक शेतात नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शिरले आहे. तर याच ठिकाणी गावात देखील नागरिकांच्या घराना पुराचा फटका बसलाय. माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी याच भागाची दोन वर्षांपूर्वी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नाला दुरुस्तीचे आश्वासन दिले होते, परंतु अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची खंत शेतकर्‍यांनी बोलून दाखवलीय. नाल्याने वेढलेल्या कोलगाव या गावातील मोठ्या नाल्यांची उंची वाढविण्याची मागणी शेतकरी व गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.  असे असले तरी अद्याप लोकप्रतिनिधीसह कर्मचारी, अधिकारी गावात पोहोचले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. 


अतिवृष्टीनं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली


मागील 48 तासात भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीनं झाली. याचा सर्वाधिक फटका पवनी आणि लाखांदूर तालुक्याला बसला. दरम्यान,  काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात पिकांची लागवड केली होती. गोसीखुर्द धरणातून सोडण्यात येणारं पाणी आणि मुसळधार पावसाचं पाणी यामुळं हजारो हेक्टरमधिक भातशेती पूर्णपणे पाण्याखाली आली आहे. पुढील काही दिवस शेतातील हे पाणी निघणार नसल्याचं चित्र दिसून येत असल्यानं,  भातपीकाची नासाडी होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं आर्थिक संकट ओढवून शकतं, अशी भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.  


सलग पाचव्या दिवशीही गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. 19 जुलै पासून गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस बरसला असून यामुळे सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि देवरी या तीन तालुक्यांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली होती. काल पावसाचा जोर कमी होता त्याच्यामुळे आज अनेक भागांमधील पूर ओसरताना दिसत होता. मात्र, आज पुन्हा सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अद्यापही पाऊस सुरू आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील इटीयाडोह प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून ओव्हरफ्लो होण्याचा मार्गावर आहे.


इतर महत्वाच्या बातम्य