Vidarbha Rain Update :  गेल्या दोन दिवसापासून उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टी सदृश्य  पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही विदर्भातील  बहुतांश भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. तर या पावसाचा सर्वाधिक जोर हा  पूर्व विदर्भात बघायला मिळाला असून मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला आहे.   


अशातच, गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरू असल्याने  गोंदिया जिल्ह्यातील नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला हे धरण सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे धरण असुन तेही आता तुडुंब भरले आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्याकरिता धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून 2970 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाद्वारा देण्यात आला आहे.


जिल्हा परिषद शाळेत शिरले पाणी, शालेय पोषण आहाराचेही नुकसान


गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात मेघगर्जनेसह वादळी मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वत्र जलमय परिस्थीती निर्माण झाली आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच शुक्रवारला रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडटोली पुराच्या पाण्याने चारही बाजूने वेढलेली आहे. वर्ग खोल्यात गुडघाभर पाणी साचून सर्व साहित्याची नासधूस झालेली आहे. तसेच या पाण्यात भिजून शालेय पोषण आहाराचे साहित्य खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी याची माहिती वरिष्ठांना कळविलेली आहे. अर्जुनी मोरगाव परिसरात शुक्रवारला पडलेल्या रात्रभर पावसाने संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे. आज शनिवार असल्याने सर्व शिक्षक व विद्यार्थी सकाळी शाळेत उपस्थित झाले तर काय शालेय परिसर बघून अचंबित झाले. परिणामी, शिक्षकांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यात घुसून सर्व साहित्य व्यवस्थित ठेवले आहे.


गडचिरोली जिल्ह्यात 40 पैकी 23 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद 


पावसाची ही परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात देखील बघायला मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिला होता. जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 3 मोठे मार्ग तर 10 लहान मार्ग असे एकूण 13 मार्ग वाहतूक साठी बंद झाले आहेत. आज सकाळी 8.30 वाजता Manual rain gauge station चे नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी 79.2 मि.मी. पाऊस झालेला आहे, 40 पैकी 23 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली असुन धानोरा तालुक्यातील मुरुमगाव मंडळमध्ये सर्वाधिक 156.4 मि.मी. पावसाची नोंद आहे.


इतर महत्वाच्या बातम्य