नागपूर: वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन पेटलं असताना, आता विदर्भ राज्य आंदोलन समितीने परत एकदा प्रतिरूप विधानसभा भरवण्याचं ठरवलं आहे. यासाठी बैठकीही घेण्यात आली. मात्र वेगळ्या विदर्भासाठी कसोशीनं भूमिका मांडणाऱ्या श्रीहरी अणेंना यातून दूर ठेवल्याचं चित्र आहे.

शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप हे प्रतिरूप विधानसभेचे मुख्यमंत्री असून विदर्भवादी आंदोलकांच्या या विधानसभेत ६२ आमदार असतील पैकी ४० राज्यकर्ते तर २२ विरोधक. तर शेतकरी नेते राम नेवले विरोधपक्ष नेता असतील. याविरोधात मनसेनं जोरदार आंदोलन करत प्रतिविधानसभेला विरोध दर्शवला आहे.

या प्रतिरूप विधानसभा कामकाजात उरी हल्ल्यापासून ते अनेक बाबींचा समावेश आहे. मात्र याचं साधं आमंत्रणसुद्धा अणेंना दिलं नसल्यानं वाद उद्भवण्याची शक्यता आहे. तसचं या प्रतिविधानसभेसाठी कॅबिनेट बनवण्यात आलं असून प्रति चीफ जस्टीस हे प्रती राज्यपालांना उद्या शपथ देतील आणि राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना शपथ देतील.