मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरचं नाराजीनाट्य आणि संघर्ष अद्याप कायम असल्याचं दिसतंय. कारण राम शिंदे यांनी अद्याप जलसंधारण विभागाचा पदभारच स्वीकारलेला नाही. पंकजा मुंडे यांची नाराजी टाळण्यासाठी, राम शिंदे यांनी पदभार स्वीकारलेला नाही, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.


 

राम शिंदे हे पंकजा मुंडे परदेशातून आल्यानंतरच त्यांच्याशी सल्लामसलत करून पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील शितयुद्धात आपला बळी न जावा यासाठी राम शिंदे यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास राम शिंदे यांनी नकार दिला आहे.

 

सध्या राम शिंदे मतदारसंघात असून दोन दिवसांनी मुंबईत परतणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदे यांची गृहराज्य मंत्रीपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली. यावेळी त्यांना पंकजा मुंडेंकडून काढून घेण्यात आलेलं जलसंधारण खातं देण्यात आलं.

 

संबंधित बातमी - मुख्यमंत्र्यांसोबतच्या वादानंतर पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट

 

हे खातं काढून घेतल्यामुळे पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती.

 

दोन महत्त्वाची खाती काढून घेतली

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेकडील जलसंधारण आणि रोजगार हमी योजना ही दोन महत्त्वाची खाती काढून घेण्यात आली. सध्या त्यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला बालकल्याण या खात्यांची जबाबदारी आहे. कॅबिनेटपदी प्रमोशन झालेल्या राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे रोजगार हमी योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

पंकजांचं ट्वीट आणि मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय

तत्पूर्वी सिंगापूरला वर्ल्ड वॉटर लीडर समिटसाठी पोहोचलेल्या पंकजा मुंडेंनी आता मी जलसंधारण खात्याची मंत्री नसल्याने या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं ट्वीट केलं होतं. त्यावर खात्याची मंत्री म्हणून नव्हे तर सरकारची प्रतिनिधी म्हणून या परिषदेला हजर राहा, असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजांना आदेश दिला होता.

संबंधित बातम्या


मुख्यमंत्र्यांसोबतच्या वादानंतर पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट


पंकजा मुंडे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन


जलसंधारण खातं काढल्यानं पंकजांची ट्विटरवरुन नाराजी, मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय…


मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटप जाहीर, पंकजा मुंडे आणि तावडेंना धक्का


खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?