मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचितच्या समावेशाची आणि जागावाटपाची चर्चा सुरू असताना वंचितने (VBA) दिलेल्या प्रस्तावामुळे आघाडीचा तिढा अधिक वाढणार असल्याचं दिसतंय. राज्यातल्या एकूण 48 जागांपैकी 27 जागा वंचितला द्या अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचा आणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने दावा केलाय. वंचितच्या या मागणीनंतर आता महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची प्रतिक्रिया नेमकी काय असेल हे पाहावं लागेल. 


वंचितने दावा केलेल्या 27 जागा कोणत्या? 


अकोला
अमरावती
नागपूर
भंडारा-गोंदिया
चंद्रपूर
हिंगोली
उस्मानाबाद
औरंगाबाद
बीड
सोलापूर
सांगली
माढा
रावेर
दिंडोरी
शिर्डी
मुंबई साऊथ सेंट्रल
मुंबई उत्तर मध्य
मुंबई उत्तर पूर्व
रामटेक
सातारा
नाशिक
मावळ
धुळे
रावेर
नांदेड
बुलढाणा
वर्धा


वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिलेल्या प्रस्तावात काय म्हटलंय?


वंचित बहुजन आघाडीची जेव्हा कुठल्याही पक्षासोबत युती नव्हती, कोणासोबतच आमची चर्चा नव्हती, तेव्हा आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या 27 जागांवर लक्ष केंद्रित केले होते. 


काल महाविकास आघाडीने जेव्हा आमच्याकडे प्रस्ताव मागितला, तेव्हा आम्ही ज्या 27 मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते, जिथे आम्ही संघटनात्मक ताकद उभी केली होती, त्या जागा त्यांना दिल्या. 


ह्या जागांवरील काही जागांवर ह्या वाटाघाटी होऊ शकणाऱ्या आहेत, त्यासाठी आम्ही चर्चेला तयार आहोत आणि त्या चर्चेतून सुटतील हा आम्हाला विश्वास आहे.


वंचितच्या महाविकास आघाडीकडे 4 मागण्या 


महाविकास आघाडीकडून मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी. पुण्यातून डॉ. अभिजीत वैद्य यांना मविआचा उमेदवार म्हणून घोषित करावे. मविआच्या उमेदवारांच्या यादीत 15 ओबीसी तर 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत, अशा 4 प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केल्या आहेत.


राज्यातील एकूण 48 जागांपैकी 20 जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. या 20 जागांवर शिवसेना लढण्यास ठाम असल्याचं सांगितलं जातंय. 


दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वंचितच्या मागणीवर स्पष्टीकरण दिलं आहे. वंचितचा हा दावा नसून त्यांची 27 जागांवर लढण्याची इच्छा आहे, त्यामुळे यावर चर्चा केली जाईल असं ते म्हणाले. तसेच जिंकणे हा एकमेव निकष असेल, जो ज्या मतदारसंघात जास्त ताकदीचा त्या पक्षाला उमेदवारी मिळेल, भाजपला हरवणे हे एकमेव सूत्र असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले. त्यामुळे वंचितच्या प्रस्तावावर आता मविआतील इतर पक्ष काय भूमिका घेतात ते बघावं लागेल. 


ही बातमी वाचा: