मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाविकास (Maha Vikas Adhadi) जागावाटप संदर्भातील बैठक आज (28 फेब्रुवारी) सलग दुसऱ्या दिवशी होत आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची जागावाटपाचा फॉर्मुला अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीमध्ये काही जागांबाबत अंतिम चर्चा होणार असल्याचे समजते. यानंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा होऊन या संदर्भातील मसुदा जाहीर करण्यात येणार आहे. 


वंचित बहुजन आघाडीकडून चार प्रतिनिधी उपस्थित


दरम्यान आजच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून चार प्रतिनिधी उपस्थित आहेत. दरम्यान काल झालेल्या बैठकीला वंचितचे राज्य उपाध्यक्ष डॉ.धर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. आजच्या बैठकीसाठी चार प्रतिनिधी उपस्थित आहेत दरम्यान जागावाटप निश्चित झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते  जाहीर करणार आहेत. 


दरम्यान, त्यापूर्वी दोन फेब्रुवारीनंतर झालेल्या कोणत्याही कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आले नव्हते. 24 फेब्रुवारीला झालेल्या कार्यकर्त मेळाव्यातही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नव्हते. परंतु, तरीही आम्ही महाविकास आघाडीसाठी सकारात्मक आहोत”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. दोन फेब्रुवारी रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्याआधी प्रकाश आंबेडकर आणि नाना पटोले यांच्यात राजकीय मतभेद झाले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मविआत जागा मिळेल की नाही याबाबत साशंकता होती. परंतु, मतभेद विसरून काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीला हिरवा कंदील दाखवला आणि महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यात आले.


प्रकाश आंबेडकरांना साद


 दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडून जागा वाटपावर दोन दिवसांमध्ये स्पष्टता द्यावी, असे पत्र दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली होती. यानंतर काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना भावनिक साद घालत सोबत येण्याचे आवाहन केलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्या