3 जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोलिसांना शाळेचा आवारात सापडला होता. तिचं आरोपी मनिष यादववर प्रेम होतं. मात्र ती आपल्याच मित्रांसोबत बोलत असल्याने, दोघांचं अफेअर असल्याचा संशय मनिषला आला. त्याच रागातून त्याने प्रेयसीची हत्या केली.
वसईत शाळेच्या आवारात तरुणीचा मृतदेह सापडला
हत्या झाली त्या दिवशी मनिष तिला घेऊन विद्याविकास शाळेच्या आवारात गेला होता. तिथे त्याने दगडाने तिची निर्घृण हत्या केली. सुरुवातीला हा बलात्कार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र हा बलात्कार नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. हत्येनंतर कोणाला संशय येऊ नये, म्हणून त्याने तिच्या अंगावरचे कपडेही काढून फेकून दिले होते.
दोन महिन्यांपासून पोलिस आरोपीच्या शोधात होते. पोलिसांनी वेषांतर करुन त्याला दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हाही नोंदवला आहे.