वसई : जिममध्ये व्यायाम करताना 30 वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. वसईत काल सकाळी 11.30 च्या सुमारास वसईच्या "एव्हरशाईन जिम" मध्ये ही धक्कादायक घटना घडली.


जेनिडा कार्व्हालो असं मृत तरुणीचे नाव असून ती 'मधूबन हाईटस' या इमारतीत राहत होती.

वसईच्या एव्हरशाईन सिटीत नव्यानेच जिम सुरु झाली होती.  या जिममध्ये व्यायाम करताना ती खाली कोसळली.

जिममधील लोकांनी तिला बाजूच्याच रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

जेनिडा कार्व्हालोचा मृत्यू कशामुळे झाला, याचं नेमकं कारण काय, ही माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

याप्रकरणी तुलिंज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच नाशिकमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती.  जिममध्ये व्यायाम करताना एका 19 वर्षीय  तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या उत्तमनगर परिसरात घडली होती.

संबंधित बातम्या

जिममध्ये व्यायाम करताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू 

जिम करताना कोसळलेल्या अजिंक्यचा मृत्यू कशामुळे?