रायगड: रायगड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुकाणू समितीची खिल्ली उडवली  आहे. राज्य सरकारनं दिलेल्या कर्जमाफीचा विदर्भ, मराठवाडा, कोकणातल्या शेतकऱ्यांना फायदाच होईल. मात्र, सुकून गेलेल्या समितीसंदर्भात आपल्याला काहीच बोलायचं नाही असं सांगत सुकाणू समितीची त्यांनी खिल्ली उडवली.


भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त खत वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी सदाभाऊ खोत उपस्थित होते. याप्रसंगी, बोलताना सदाभाऊ खोत यांनी कोकणातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून कोकणातील फळ लागवड, अन्न प्रक्रियेला चालना देण्यासाठी अन्न प्रकिया अभियान सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

तर, कोकणातल्या नाचणी, तांदूळ, फळे, लोणची यांना बाजारपेठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं.