Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे सत्तधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. अशात भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडून कोकण दौरा केला जात आहे. त्यांच्या याच दौऱ्यावरून भाजप-विरुद्ध ठाकरे गट असा वाद पाहायला मिळत आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी शेलार यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील आमदार वैभव नाईक यांची मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कोकण दौऱ्याववरून टीका केली आहे. मुंबईत गुजराती माणसाच्या मागे फिरणाऱ्यांनी, मुंबईत गुजराती उमेदवारांना तिकीट देणाऱ्यांनी कोकणातील माणसांना तत्त्वज्ञान शिकू नये, असे म्हणत नाईक यांनी शेलार यांच्या कोकण दौऱ्यावरून हल्लाबोल केला आहे. 


भाजपने कोकणच्या सुपुत्राला नेमकी कोणती पद दिली?


फक्त निवडणुका आल्या की, आशिष शेलार हे कोकणाचे सुपुत्र असल्याचा आव आणतात. मुंबईमध्ये कोकणच्या सुपुत्राला नेमकी कोणती पद भाजपने दिली? याचे उत्तर आशिष शेलार यांनी द्यावं आणि मग विनायक राऊत यांच्या विरोधात कोकणात प्रचार करावा, असा टोला आशिष शेलारांच्या कोकण दौऱ्यावर वैभव नाईक यांनी लगावला आहे. 


गुजराती माणसाच्या मागे फिरणाऱ्यांनी तत्त्वज्ञान शिकू नये


मुंबईत गुजराती उमेदवाराला खासदारसाठी किती तिकीट दिली जातात, मात्र मराठी माणसाला कुठलेही पद भाजपकडून दिले जात नाही. खऱ्या अर्थाने ताट मानेने कोकणी सुपुत्राला मुंबईत स्थान दिलं ते ठाकरे कुटुंबीयांनी दिले आहेत. अनेक उद्योग गुजरातमध्ये जातात त्यावर आशिष शेलार ब्र बोलत नाही. आणि आशिष शेलार यांनी कोकणी माणसासाठी केले काय? हे आधी सांगावं. गुजराती माणसाच्या मागे फिरणाऱ्यांनी कोकणी माणसांना तत्त्वज्ञान शिकू नये, अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी अशी शेलार यांच्या कोकण दौऱ्यावर दिली आहे. 


महायुतीचा उमेदवार कोण? 


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेकडेच राहावी यासाठी सामंत बंधू प्रयत्नशील आहेत. अशात भाजपकडून देखील या जागेवर दावा केला जात असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघातून रिंगणात उतरवण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु आहेत. विशेष म्हणजे नारायण राणे यांनी उमेदवारीसाठी चार अर्ज घेतल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे किरण सामंत यांनी मुंबईकडे धाव घेतली आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Ashish Shelar Vs Ambadas Danve : आधी शेलार, मग दानवे...! एकमेकांवर काव्यात्मक टीका; वाचा कोणाची कविता भारी?