पुणे : बारामती लोकभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार दणक्यात प्रचाराला लागल्या आहेत. बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांनाच मतदान केलं होतं. यावेळीही तेच करायचं आहे. आतापर्यंत वडिलांना म्हणजे पवारसाहेबांना, मुलाला म्हणजे मला, मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सुनेला मतदान करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचं मत योग्य आहे, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे आहेत असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला होता. पवारांचं हेच वक्तव्य ऐकून सुनेत्रा पवार चांगल्याच भावूक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पवारांनीच मला सून म्हणून निवडलं असल्याचं सुनेत्रआ पवार म्हणाल्या. त्यानंतर बाकी प्रश्न विचारताच हात जोडून निघून गेल्या.
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुनेत्रा पवार चांगल्याच नाराज झाल्या आहेत. त्यांचं वक्तव्य ऐकून सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले. आज सुनेत्रा पवार पुणे दौऱ्यावर आहे. पुण्यात महायुतीचे पुणे जिल्ह्यातील तीन उमेदवारांनी मुरलीधर मोहोळ, आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्र प्रचार केला. यावेळी सुनेत्रा पवारांशी संवाद साधला असता त्या पुन्हा एकदा भावूक झाल्याचं दिसून आलं होतं.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, घरातील सगळी मोठी माणसंच सुनेची निवड करतात. तशी माझी निवड शरद पवारांनीच केली होती. बारामतीत अटीतटीची लढत वगरे काही नाही.नातं नात्याच्या जागेवर आहे. राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. ही विचारांची लढाई आहे नात्याची नाही. बारामती तालुक्यातील सगळ्याच भागात फिरले. सगळ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. लोकांकडून मोठ्या प्रमाणात माझं स्वागत होत आहे. त्यामुळे मला सकारात्मक वाटत आहे. मला उमेदवारी मिळाली, ही बारामतीकरांची इच्छा होती. जनता हेच माजं कुटुंब आहे. जनता माझ्या पाठीशी उभी असल्याचं त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते अजित पवार?
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत अजित पवारांनी बारामतीकरांना आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते की, बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांनाच मतदान केलं होतं. यावेळीही तेच करायचं आहे. आतापर्यंत वडिलांना म्हणजे पवारसाहेबांना, मुलाला म्हणजे मला, मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सुनेला मतदान करायचं आहे.
इतर महत्वाची बातमी-
पुणे- नाशिक मार्गावर मोठा अपघात; खासगी बस पुलावरुन कोसळली, 15 ते 20 प्रवासी जखमी