मुंबई : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार (Rain) पाऊस व ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 4 पर्यटकांचे निधन झाल्याची माहिती आहे. येथील ढगफुटीसदृश्य परिस्थितीमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याती 11, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 4 आणि इतर जिल्ह्यांतील 36 अशा एकूण 51 पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांची संपर्क करत आहे. त्यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे. दरम्यान, उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात, डोंगरावरून आलेल्या आलेल्या महाप्रलयात अवघ्या 34 सेकंदात एक संपूर्ण गाव वाहून गेले. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि 50 हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी
* राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
* राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : ०१३५-२७१०३३४ / ८२१
सोलापुरातील चारही तरुण सुखरुप
सोलापुरातून उत्तराखंडला गेलेले चारही तरुण सुखरूप असल्याची माहिती आहे. सोलापुरातून उत्तराखंड येथे गेलेल्या चारपैकी एका पर्यटकाने फोनद्वारे आपण सुखरुप असल्याची माहिती दिली. हे चौघे ही तरुण बेस कॅम्पमध्ये सुखरूप आहेत. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले आणि मल्हारी धोटे हे चौघे सोलापुरातील तरुण उत्तराखंड गेले होते. गंगोत्री येथील बेस कॅम्पमध्ये सध्या सर्वजण सुखरूप असल्याचा मेसेज यातील एका तरुणाने आपल्या मित्राला वॉट्सअप द्वारे पाठवला आहे. तर जिल्हा प्रशासनाने देखील माहिती तपासली असता सर्वजण सुखरूप असल्याचे समजले आले. मोबाईल फोनला नेटवर्क नसल्याने सपंर्क होतं नसल्याचे तरुणांनी मेसेज व त्यातील एकाने नेटवर्कच्या ठिकाणी येऊन फोनद्वारे कळवले आहे. दरम्यान, उत्तराखंड येथील परिस्थिती नियंत्रणात येताच चौघेही सोलापूरला परत येतील.
हेही वाचा
आपल्यासोबत घात नाही, विश्वासघात झालाय; लेकाच्या भाषणातील शब्द ऐकताच भास्कर जाधवांना अश्रू अनावर