Mla Bacchu Kadu :  अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं साल 2018 रोजी केलेल्या एका राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर तातडीनं मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत बच्चू कडू यांनी ताप्तुरता जामीन मंजूर मिळवला आहे.  आमदार बच्चू कडू हे एम.पी.एस.सी , परीक्षा घेण्यात येणाऱ्या महापोर्टल  बंद करण्यासाठी तत्कालीन , पी, प्रदीप .महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक यांची 26 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय येथे भेट घेतली होती. यावेळी पी प्रदीप आणि आमदार बच्चू कडू यांच्यत वाद झाला होता. तेव्हा , बच्चू कडू यांनी टेबलावरील  लॅपटॉप पी प्रदीप यांच्यावर उगारला होता , त्यामुळे मंत्रालय कर्मचारी यांनी उग्र आंदोलन केले होते. तर याप्रकरणी प्रदीप यांनी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. 


काय आहे प्रकरण -


26 सप्टेंबर 2018 रोजी पोर्टलसंबधित प्रकरणाबाबत मंत्रालयमध्ये काम करणाऱ्या तत्कालीन माहिती तंत्रज्ञान संचालक पी. प्रदीप यांना भेटण्यासाठी बच्चू कडू गेले होते. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये बच्चू कडू यांनी टेबलवर असलेला लॅपटॉप उचलून प्रदीप यांच्यावर उगारल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद कर्मचारी संघटनेत उमटले होते आणि  मंत्रालय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनही केलं होतं. त्यानंतर बच्चू कडू यांच्यावर आंदोलन करताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल आयपीसी कलम 353, 504 आणि 506 अंतर्गत फौजदारी तक्रार मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 


कोर्टात नेमकं काय झालं -


यासंबंधी गिरगाव न्यायालयात रितसर खटला सुरू आहे. या खटल्याचं वारंवार समन्स बजावूनही बच्चू कडू कधीही सुनावणीला हजर रहीले नाहीत. त्यामुळे न्यायालयानं अखेर या प्रकरणात त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यावर बुधवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान बच्चू कडू स्वतः अखेर कोर्टापुढे हजर झाले, आणि त्यांच्याकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र, न्यायालयानं हा अर्ज स्वीकारण्यास नकार देत त्यांना थेट चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गिरगाव दंडाधिकारी न्यायालयानं ही कोठडी सुनावल्यानंतर बच्चू कडू यांच्यावतीनं तातडीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर संध्याकाळी उशिरा तातडीची सुनावणी पार पडली तेव्हा, न्यायाधीश राहुल रोकडे यांनी बच्चू कडू यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर ताप्तुरता जामीन मंजूर केला.