Unseasonal Rain in Vidarbha : राज्यामध्ये पुन्हा एकदा विदर्भामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून निसर्ग चक्रातील बदलाने शेती आणि शेतकरी सापडले असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. 


अमरावती जिल्ह्यात धामणगाव तालुक्याला झोडपले


अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्याला अवकाळी पावसासह गारपट्टीचा फटका बसला. धामणगाव तालुक्यातील देवगाव, तळेगाव, दशासर परिसरामध्ये गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. धामणगाव तालुक्याला दुपारच्या सुमारास गारपीटीचा प्रचंड फटका बसला. त्यामुळे भाजीपाला, फळबागांचे नुकसान झालं आहे. 


यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी


यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील विरखेडे, वाटखेड, गोंधळी, घारपळ या गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तूर, हरभरा, गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान झालं आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये गारपीट झाली. त्यामुळे चना, गहू पिके संकटात सापडली आहेत.


वर्धा जिल्ह्यातही अवकाळी पाऊस


वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. वर्धाच्या देवळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. गारांच्या पावसाने पिके जमीनदोस्त झाली आहेत. देवळी तालुक्यातील भिडी, तळणी, आकोली, लोणी, आगरगाव या भागात सर्वाधिक पाऊस झाला असून चणा, गहू, तूरीचे मोठे नुकसान झालं आहे. आज सकाळपासून वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरण  होते.


विदर्भासह मराठवाड्याला यलो अलर्ट


दुसरीकडे, राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. विदर्भासह मराठवाड्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.  विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण असणार आहे. विदर्भात 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या पाच दिवसात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात 


इतर महत्वाच्या बातम्या