Maharashtra Rain Updates: मुंबई : रब्बीच्या हंगामात (Rabi Season) शेतकऱ्यांना (Farmers) अवकाळीशी (Maharashtra Unseasonal Rain) सामना करावा लागणार आहे. राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Rain Updates) तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाच्या (Department of Meteorology) वतीनं देण्यात आला आहे.


राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे. आज तुरळक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजही देण्यात आला आहे. 


पुढील 4 ते 5 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला गेला आहे. रविवारी पावसाचा जोर अधिक प्रमाणात दिसू शकतो. मुंबईत पावसाचा अंदाज असल्यानं हवा गुणवत्ता पातळी चांगली होण्याची शक्यताही आहे. 


पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळू शकतो. सोबतच, उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी गारा पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती आणि बुलढाणा परिसरात शनिवारपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


शिर्डी जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत संभ्रमावस्था; पाणी सुटणार कधी याकडे मराठवड्याचं लक्ष