Unseasonal Rain Hits Farming :  आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्यांना सामान्यजणांचा खिसा आणखी रिकामा होण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे सध्याचे दर हे ८० रुपये किलोपर्यंत पोहचू लागले आहेत. अशातच येत्या काही दिवसात टोमॅटोच्या दरात अजून वाढ होऊन ते गगनाला भिडण्याची चिन्हं आहेत. राज्यात आलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम सर्वांवर होणार आहे. 


बुधवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाचा मोठा फटका हा नाशिकमधील द्राक्ष, कांदा यासोबतच टोमॅटो पिकाला बसला आहे. टोमॅटोच्या बागेत पाणी साचले असून टोमॅटोला तडे गेले आहेत.  अनेक ठिकाणी तर टोमॅटो गळून पडला आहे.  या सर्व परिस्थितीमुळे टोमॅटो उत्पादक चिंतेत आहेत. तर, दुसरीकडे टोमॅटोच्या पिकाला चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. 


पुणे कृषी बाजारपेठेत आवक घटली 


अवकाळी पावसाने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक जवळपास 50 टक्क्याने घटली असून भावही 40 ते 50 टक्क्यांनी पडलेत. त्यातच पावसामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी नसल्याने मालाला मागणी नाही. बाजार समितीत येणाऱ्या पालेभाज्या आणि इतर माल पावसामुळे येऊ शकला नाही आणि पावसाचा जोर कायम राहिला तर, भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. 


पाहा व्हिडिओ:  रत्नागिरी, सिंधुदुर्गात आंबा-काजूला फटका


 



अवकाळी पावसाने बळीराजा पुन्हा संकटात


ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.  तर, कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला या पावसानं धडकीच भरली आहे. सातारा शहर आणि महाबळेश्वरमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे स्ट्रॉबेरीचं पीक धोक्यात आलं. तिकडे कोकणातील रत्नागिरीतल्या चिपळूण, गुहागर, खेड, दापोलीतही सरी बरसल्यात. त्यामुळे आंबा पीक संकटात सापडलंय. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. 


पाहा व्हिडिओ:  Maharashtra Rains : अवकाळी पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका, कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव


 



 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut : मुंबईला ओरबाडून गुजरात आत्मनिर्भर; संजय राऊत यांचा भाजपला टोला


Omicronच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क, RTPCR निगेटिव्ह आणि लसीकरण अनिवार्य, हे नियम वाचाच