नांदेडमधील तामसा गावात शेकडो कुत्रे सोडणारी ‘ती’ व्यक्ती कोण?
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2016 01:05 PM (IST)
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तामसा गावातील नागरिक सध्या कुत्र्यांच्या दहशतीखाली आहे. प्रकारही तसाच आहे. एका अज्ञात व्यक्तीने तामसा गावात टेम्पोतून शेकडो कुत्रे सोडले आहेत. तामसा ग्रामस्थांनीच तसा आरोप केला आहे. कुत्र्यांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. अनेक शेळ्यांचा या कुत्र्यांनी फडशा पाडला असून, काही लहान मुलांनाही चावा घेतला आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होते आहे. तामसा गावातील बाजारपेठेत बाजाराच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. मात्र, कुत्र्यांचा धसका घेतल्यानं स्थानिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे. एखादी व्यक्ती अशाप्रकारे गावात कुत्रे आणून सोडते, ही बाब धक्कादायक असून याप्रकरणी पोलीस चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.