बीड : इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ( आय यु सी एन ) च्या लाल यादीत अतिशय चिंताजनक या वर्गात येणाऱ्या जिप्स प्रजातीच्या गिधाडांची संख्या जगभरातून 99.7 टक्यांनी कमी झाली असतांना बीडमध्ये या प्रजातीचे भारतीय गिधाड (Indian vulture) आढळून आले आहे. या गिधाडांची शुश्रुषा सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात करण्यात येत आहे. त्यास लवकरच निसर्गात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांनी  विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले जैवसाखळीतील महत्त्वाचा दुवा असणारे भारतीय गिधाड /लांब चोचीचे गिधाड Indian vulture/ Long-billed Vulture (Gyps Indicus)  हे नुकतेच बीड जिल्ह्यातील खामगाव येथील माळरानावर घायाळ अवस्थेत गुरख्यानां दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी या गिधाडांची माहिती तात्काळ वनविभागाला दिली.

हे गिधाड तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात  दाखल करण्यात आले.त्यानंतर सामाजिक वन विभागाचे  विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांनी सर्पराज्ञीस भेट देऊन या गिधाडांची पाहणी केली. सध्या गिधाडांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यास लवकरच निसर्गात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे यांनी दिली.

Letter Paintings Exhibition | हा खेळ अक्षरांचा,बोलक्या अक्षरांचं प्रदर्शन, पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाकडून आयोजन



गिधाडांचे वैशिष्ट्य

गिधाड हे मृतभक्षक वर्गातील पक्षी  असून ते प्राण्यांच्या मृतदेहावर जगतात.
33हजार फुटापेक्षा वर उंच आकाशात भरारी घेतो. ही भरारी एव्हरेस्टच्या उंचीच्या वर.
नजर अतिशय तीक्ष्ण असते.
थव्याने प्रवास करतात.
एकावेळी एक किंवा दोन अंडी देतात. वर्षातून एकदाच प्रजनन करतात.

संबंधित बातम्या :