सिंधुदुर्ग : भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती, असा घणाघात अमित शाहंनी केला आहे. महाविकासआघाडी आणि शिवसेनेवर शाहांनी जोरदार हल्ला केला आहे. महाराष्ट्रात तीन चाकी ऑटोरिक्षाचं सरकार तयार झाल्याचं ते म्हणाले. तीन चाकी सरकारची चाकं तीन दिशेला असल्याचं म्हणत शाहंनी हल्लाबोल केला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या उदघाटन सोहळ्याचा प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते.


जनादेशाविरोधात स्थापन झालेलं सरकार....


बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीमध्ये वाहू देत ही सत्ता स्थापन करण्यात आल्याचं म्हणज शाहंनी शिवसेनेवर तोफ डागली. दाराआड शिवसेनेसोबत कधीच चर्चा झाली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 'मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, आपण जो जनादेश दिला होता त्याचा अनादर करत सत्तेच्या लालसेपोटी, जनादेशाविरोधात हे सरकार आलं आहे. जनादेश होता की पंतप्रधान मोदी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्त्वाखाली इथं भाजप आणि शिवसेनेचं सरकार व्हावं. पण, ते म्हणतात की आम्ही वचन मोडलं. आम्ही तर वचनं पाळणारी माणसं आहोत, असं खोटं कधीही बोलत नाही', असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी परराज्यांतील युती सरकारची उदाहरणंही दिली.



मोदींच्या नावे प्रचार केला, मतं मिळवली


अमित शाह इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शिवसेनेने मोदींच्या नावे निवडणुकांचा प्रचार केल्याचं म्हणत पोस्टरवर सर्वात मोठा फोटो मोदींचाच छापल्याची बाब अधोरेखित केली. मोदींच्या नावे मतं का मागितली गेली, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हटलं जात होतं तेव्हा तुम्ही का काही बोलला नाहीत असे बोचरे प्रश्न शाहंनी यावेळी उपस्थित केले.


Uttarakhand Glacier Collapse Video | 'भागोsss', हिमकडा कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं


केंद्रीय गृहमंत्र्यांनी शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या या सर्व टीका पाहता, आता राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून काही उत्तर दिलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.