लातूर : उदगीर जिल्ह्यात नववीत शिकणाऱ्या मुलाने सहा मित्रांना सुपारी देऊन आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईची हत्या करण्यासाठी आरोपी मुलाने त्याच्या सहा मित्रांना 3 लाख 25 हजार रुपयांची सुपारी दिली होती.


 

महत्त्वाचं म्हणजे या हत्येसाठी मुलाने त्याच्या मित्रांना सव्वा लाख रुपयांची अनामत रक्कमही दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून एकाला ताब्यात घेतलं आहे. सहापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

 

मुलाचे शौक आणि आईचा विरोध

मुलाचे वडील प्रशांत पेन्सलवार उदगीरमधील हे मोठे किराणा व्यापारी आहेत. मुख्य मार्केटमध्ये त्यांचं किराणा दुकान आहे. मुलाचे शौक बघून आई त्याला सतत अडवत होती. दुकानातून पैसे घेण्यास विरोध करत होती. त्याचा राग मुलाच्या मनात होता. त्यामुळे त्याने परभणीतील पलमच्या, उदगीरच्या मित्रांना आईला मारण्याची सुपारी दिली होती.

 

असा रचला कट!

एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने मुलं घरात घुसली आणि आईच्या गळ्यावर धागदार शस्त्राने वार केले. यात प्रणिता पेन्सिलवार यांचा मृत्यू झाला.

 

सोनं लुटण्याच्या उद्देशाने चोरटे घरात घुसले आणि त्यांनीच आईची हत्या केल्याचा बनाव मुलाने केला होता. तसंच मुलाने स्वत:च्या हातावरही जखमा करुन घेतल्या होत्या.

 

दरम्यान, या खुनाच्या विरोधात उदगीर शहर एक दिवस बंद करण्यात आलं होत. मारेकऱ्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. अखेर मुलानेच मित्रांना सुपारी देऊन आईची हत्या घडवून आणली.