उस्मानाबाद : गृहविभागाच्या कारभाराबाबत आम्ही बोललो असतो, तर गहजब झाला असता, बरं झालं पंकजा बोलल्या, असा टोला शिवसेनेच्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.


 

बीड जिल्हा बँकेत घोटाळा करणाऱ्या बड्या धेंडांना का अटक होत नाही, असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काल गृहखातं सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना केला होता. पंकजांच्या या प्रश्नाला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

 

आम्ही करून दाखवलं

 

या कार्यक्रमात त्यांनी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचाही समाचार घेतला. आम्ही थापा मारत नाही, तर करून दाखवतो,शिवजलक्रांती हे त्याचंच उदाहरण आहे असे ते यावेळी म्हणाले.

 

बैल गेला नि झोपा केला

 

महाबीजच्या बियाणांचे दरवाढ कमी करून काय उपयोग, असा सवाल उपस्थित करून शेतकऱ्यांनी आधीच बियाणे खरेदी केलेत, तेव्हा आपलं धोरण चुकते आहे, याचा सरकारनं विचार करायला हवा. सध्या राज्यात बैल गेला नि झोपा केला अशी स्थिती आहे. पीक विम्याचे आणि अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाल्यास काय उपयोग. तो कर्ज काढून बियाणं खरेदी करतो. त्यामुळे कर्जमाफीसाठी पुर्नगठन समिती नको तर कर्जमाफी द्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.