ठाणे : ठाण्यातील मुंब्य्रात (Thane Mumbra)  शाखेवरुन शिवसेना ठाकरे गट (Shivsena Uddhav Thackeray) विरुद्ध शिंदे गट (Shivsena Eknath Shinde)  वाद चिघळण्याची शक्यता आहे. मुंब्राच्या शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर  11 तारखेला उद्धव ठाकरे मुंब्य्राच्या शाखेला भेट देणार आहेत. 2 नोव्हेंबरला मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवला. पोलीस आणि शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करुन  शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

  


मुंब्राच्या शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर पोलीस आणि शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून  शिंदे गटाने ताबा मिळवण्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाकडून या शाखेचा मागील 22 वर्षापासून टॅक्स भरला जात असताना अशाप्रकारे या शाखेवर बुलडोजर फिरवणे चुकीचे आहे. शाखा जमीन दोस्त करू नये यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करावा, असं पोलिसांना सांगून सुद्धा पोलीस बघायचे भूमिकेत असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंब्रा येथील शाखेवर बुलडोझर फिरून ज्यांनी पाप केला आहे त्याचा हिशोब होईल, असे म्हणाले.


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी 11 नोव्हेंबरला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथील शाखेला भेट देणार असल्याचं सांगितलं आहे.  तुमच्या बुलडोझरपेक्षा स्वाभिमानी मनगटातील बळ महत्वाचे..हिशोब होईल! असे देखील संजय राऊत म्हणाले.  मुख्यमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रात मोघलाई सुरु आहे.






मुंब्रा येथे ज्या ठिकाणी ही शाखा जमीनदोस्त करण्यात आली त्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून या शाखेच्या पुनर्बांधणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. या शाखेमध्ये कुठलीही समाजपोयोगी काम होत नव्हती स्वतःच्या फायद्यासाठी या शाखेचा उपयोग केला जात होता आणि त्यामुळेच या शाखेवर आम्ही ताबा मिळवला असून इथे समाजासाठी कामे केली जातील असं शिवसेना शिंदे गटाकडून सांगण्यात आलं आहे.   


हे ही वाचा :


अनाडी घोडे उधळलेले आहेत, ग्रामपंचायत निकालानंतर राऊतांचा हल्लाबोल; भुजबळ, अजितदादा महादेव अॅपचे मेंबर असल्याची टीका