Uddhav Thackeray Speech: भाजप हा पक्ष आहे की चोरबाजर आहे. त्यांच्या पक्षातील नेते पाहिल्यानंतर बाहेरच्या पक्षातील नेते जास्त असल्याचं दिसतेय. त्यामुळे भाजप हा आयात पक्ष झालाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावात शिवसेनेचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.  बुलढाण्यात आल्यानंतर काही जुने चेहरे दिसत नाहीत. पण जुने चेहरे फसवे निघाले, गद्दार निघाले. त्यांना असं वाटलं की बुलढाणा त्यांची मालमत्ता आहे. पण तुम्हाला पाहिल्यानंतर धगधगत्या मशाली असल्यासारखं वाटतेय. आपलं सरकार व्यवस्थित चाललं होतं. पण यांनी सरकार पाडलं. पण यांची पाडायची पद्धत कशी आहे, असे ठाकरे म्हणाले. 


आपल्याला हुकूमशाही हवी की लोकशाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. काही जण 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. 40 रेडे मी नाही म्हटलं, त्यांच्याच मंत्र्याने म्हटले आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवतिर्थावरच शपथ घेतली. आमची कुलस्वामीनीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आयोध्येला गेलो होतो. हे आज तिकडे गेलेत नवस फेडायला. गेल्या आठवड्यात गेले होते, स्वत:चा हात दाखवायला. ज्याला स्वत:चं भविष्य माहित नाही, तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य जे आहे ते कुरमुडे ज्योतिषाला विचारून जमत नाही. तुमचं भविष्य दिल्लीमध्ये बसणाऱ्यांना विचारा. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं. अन् हिंदुत्व वाचवायला शिवसेना सोडून निघाले, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. 


काय म्हणाले उद्धव ठाकरे?


दसऱ्याला ठरवलेलं मुंबईबाहेर पहिली सभा बुलढाण्यात घेणार. गद्दारी गाढायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. 


गद्दारांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद मोदींचा
छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श कसे होऊ शकतात?
महाराजांचा अपमान सहन करणार नाही?
92-93 ला बाबरी पाडली तेव्हा तुम्ही कुठे बिळात लपला होतात, असा टोला भाजपला लगावला. 
सुप्रिया सुळेंवर राजकारणात शिवीगाळ कशी करु शकतात? मी असतो तर लाथ मारुन पक्षाबाहेर केले असते? 
अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंकडून गटार असा उल्लेख करण्यात आला. 
महापुरुषांचा, महिलांचा अपमान तरीही तुम्ही शेपट्या घालून कसं बसता?
आपलं सरकार गेल्यानं शेतकर्यांच नुकसान झालं. 
खोटं बोलून, रेटून सरकार चालवलं जात आहे. 
छत्रपती शिवजी महाराजांची तलवान आणणार अशी घोषणा करणार आणि राज्यपाल अपमान करणार
दिल्लीकरांना काय वाटतं महाराष्ट्रातील मर्दानगी संपली काय?
वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करावा लागेल
माझ्या शेतकऱ्यांचं भविष्य काय?
मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं शेतात जातात.. हेलिकॉप्टरनं शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख मिळवा.... 
दुखण्यामुळे घरातून मी कारभार केला तरीही तुम्ही मला मदत केली, त्याबद्दल धन्यवाद
यावेळी बैलपोळ असा कळला की बैलांवर लिहिलं होत 50खोके एकदम ओके
हे आज अपप्रचार करत होते की यांनी हिंदुत्व सोडलं का? आम्ही तर काँग्रेससोबत गेलो पण हे मेहबूबासोबत गेले त्याचं काय...?
नामांतराला मी परवानगी दिली होती
काय कमी केलं होतं तुमचं आम्ही , तुम्ही रक्ताची किंमत विसरलात काय?
तुमच्यावर गद्दार मरेपर्यंत शिक्का लागलाय.. तो कधीही पुसरणार नाही.
निवडणुकीत जिंकणं हरणं आलेच , पण हे गद्दार म्हणण्याच्या लायकीचे राहिले नाहीत.
जी ताकद पंजाबच्या शेतकऱ्यांनी दाखविली ती तुमच्यात आहे. आता ती सरकारला दाखवा.